आरसीयूच्या मराठी विभाग माजी विद्यार्थी संघाची बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
जीवनात शिस्तीला आणि वेळेला खूप महत्त्व आहे. जिद्द आणि प्रामाणिक कष्ट केल्याने यश नक्कीच प्राप्त होते, असे मत आरसीयूच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या मराठी विभागात माजी विद्यार्थी संघाची बैठक झाली. त्यावेळी अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. मनीषा नेसरकर, डॉ. मैनुद्दीन मुतवल्ली उपस्थित होते. संघातर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱया कार्यक्रमांबद्दल चर्चा करण्यात आली. स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, शाळा दत्तक घेणे, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध स्पर्धा घेणे असे निर्णय झाले.
सूत्रसंचालन सोनाली नेसरकर यांनी केले. गिरीश जोशी यांनी आभार मानले.