सरासरी 4 इंच पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत
विशेष प्रतिनिधी/ पणजी
परतीच्या पावसाने कहर केला असून शुक्रवारी रात्रीपासून पावसाने गोव्याला झोडपून काढले. तब्बल सरासरी 4 इंचाची नोंद झाली. आगामी 48 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रात गोव्यापासून 130 कि.मी. अंतरावर कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाला आहे. त्याचे चक्रीवादळात ऊपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यंदाच्या मौसमाचा शनिवारी शेवटचा दिवस होता व त्या दिवशी सकाळी 8.30 पर्यंत राज्यात 134 इंच पावसाची नोंद झाली. केपेमध्ये सर्वाधिक 148.5 इंच एवढी नोंद झाली. गेल्या 24 तासांमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत केले. राज्यातील नद्या नाल्यांच्या पाण्याचा स्तर वाढला आहे व सर्वत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी झाडे कोसळली व वीज पुरवठाही खंडित झाला.
मान्सूनने निरोप घेत असताना आपली आक्रमकता दाखविली आणि सलग चौथ्या दिवशी संततधार पावसाने झोडपून काढले. दिवसभर काळ्dयाकुट्ट ढगांनी अंधारल्यासारखे वातावरण करुन जनजीवन देखील ठप्प केले. बऱ्याच दिवसानंतर राज्यात एकाच दिवशी सरासरी 4 इंच पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून गोव्यात सर्वत्र तुफान पर्जन्यवृष्टी झाली. आज दि. 1 ऑक्टोबर रोजी देखील मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला.
चक्रीवादळाची शक्यता वाढली?
अरबी समुद्रात गोव्यापासून दक्षिणेकडे 130 कि.मी. अंतरावर कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झालेला आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खाते या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आज सायंकाळपर्यंत अरबी समुद्रात नेमके काय चाललेले आहे या विषयी सविस्तर माहिती हवामान खाते केंद्राला सादर करील. जर हे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले तर त्याचा फटका गोवा, कोकण आणि मुंबईला बसू शकतो. मात्र त्याचा परिणाम म्हणून पावसाचा जोर आणखी वाढणार. हवामान खात्याने मात्र केवळ 1 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडेल व पुढील 4 दिवसांमध्ये हलक्या स्वऊपात तुरळक पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला आहे.
अणजुणे धरणाचे सर्व दरवाजे उघडले
दरम्यान, सत्तरी तालुक्यातील अणजुणे धरणातील पाण्याचा स्तर वाढत राहिल्याने शनिवारी सकाळपासून अणजुणे धरणाचे चारही दरवाजे प्रत्येकी 15 से.मी.नी उघडले. दर सेंकदाला 60 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अणजुणे धरणात 93.20 मीटर पाणी साठविले जाते. शनिवारी त्या ठिकाणी 93.28 मीटर एवढे पाणी होते. त्यानंतर तातडीने पुन्हा एकदा धरणाची चारही दरवाजे खोलले. शनिवारी सकाळी 8.30 पर्यंत अणजुणे परिसरात 4 इंचापेक्षा जादा पाऊस झाला. मंगळवारी 4 इंच एवढी पावसाची नोंद झाल्यानंतर धरणाचे चारही दरवाजे खोलण्यात आले. पाण्याचा विसर्ग कऊन बुधवारी चारही दरवाजे बंद करण्यात आले. शनिवारी पुन्हा दरवाजे उघडले. यामुळे सांखळीच्या वाळवंटी नदीच्या पाण्याचा स्तर वाढला आणि किंचित पूरस्थिती निर्माण झाली. नदी भरुन वाहिली परंतु पाणी पात्राबाहेर गेले नाही.
गेल्या 24 तासांतील तुफानी पाऊस असा पडला (इंचामध्ये)
म्हापसा 5
पेडणे 4
फोंडा 4
पणजी 3.50
जुने गोवे 4.25
सांखळी 3
वाळपई पाऊस नाही
काणकोण 4
दाबोळी 3.50
मडगाव 4.50
मुरगाव 3
केपे 4
सांगे 4
पणजीत दिवसभर जोरदार पाऊस पडला. हवामान खात्याने अर्धा इंच पावसाची नोंद केली.
हवामान खात्याने आज रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सर्वत्र वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाबरोबरच वादळी वाऱ्याची शक्यताही व्यक्त केली आहे. वादळी वाऱ्याचा वेग ताशी 55 कि.मी.पर्यंत वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असे म्हटले आहे. गेल्या 24 तासांमध्ये सरांसरी 4 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली व यंदाच्या मौसमातील पाऊस 134 इंच झाला. यंदाच्या मौसमातील पाऊस हा वार्षिक सरांसरीच्या तुलनेत 11.5 टक्के जादा झाला आहे. सुमारे 14 इंच जादा पावसाची नोंद कऊन यंदाचा अधिकृत पावसाळी मौसम संपुष्टात आलेला आहे. तथापि, मान्सून आक्रमक झालेला आहे व तो आणखी काही दिवस कार्यरत राहणार, असा अंदाज आहे.