खानापूर तालुक्यातील तरुणाचा थक्क करणारा प्रवास : अॅक्टर ते कास्टिंग डायरेक्टरपर्यंत मारली मजल
बेळगाव : सिनेसृष्टी ही भुलभुलय्या आहे, असे म्हणतात. यामध्ये नाव कमविणे आणि कायमस्वरुपी तग धरणे ज्याला जमतय त्यांनीच यात उतरावे, असेही म्हटले जाते. आजच्या आधुनिक आणि अत्यंत वेगवान अशा सिनेसृष्टीत नाव कमविणे तसे अवघडच. मात्र जिद्द, चिकाटी आणि आपल्या कष्टाच्या ताकदीवर यश मिळविता येते. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातून आपले नशीब आजमावण्यासाठी गेलेल्या तरुणाने यात बऱ्यापैकी यश मिळविले असून आता तो बिग बॉसच्या फेरीत जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी त्याने रितसर अर्जही केला असून त्याची निवड होईल, असे त्याला वाटते. अजित परशराम पाटील असे त्या कष्टाळू आणि संयमी तरुणाचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील मेंडील या गावातून त्याने शिक्षणाचा प्रवास करतानाच त्याला सिनेसृष्टीची ओढ होती. घरची परिस्थिती तशी हलाखीचीच होती. मात्र त्याने आपल्या मनातील जिद्द आणि संयम, प्रामाणिकपणा या जिद्दीवर पुणे शहर गाठले आणि आपले नशीब आजमावण्यास सुऊवात केली. घरातील परिस्थिती पाहता त्याला इतरत्र कामाला जाण्याचा सल्ला मिळाला. मात्र आपण सिनेजगतातच काम करू, असे त्याने ठरविले. त्याच्या चिकाटीमुळे त्याने आतापर्यंत बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात कामे केली आहे. सुऊवातीला सिनेसृष्टीत हाती येईल ते काम करून त्याने तब्बल वर्षभर यामध्ये आपला पाय रोवून ठेवला. त्यानंतर अभिनयापासून हळूहळू सुऊवात करत त्याने आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर छोटे छोटे अभिनय करत त्याने यामध्ये आपला जम बसविला. अभिनयापासून ते कास्टिंग डायरेक्टरपर्यंत त्याने आता मजल मारली आहे. त्यामुळे त्याच्या या अभिनयाची चर्चा आता साऱ्यांकडेच होत आहे. या क्षेत्रात त्याने आता तब्बल 4 वर्षांचा प्रवास केला आहे. मात्र सुऊवातीच्या हालअपेष्टा आणि परिश्रम पाहिल्यास मोठे कष्ट उपसावे लागतात, असेही तो सांगतो. अजित याचे शालेय जीवन गावातच गेले. मात्र सुऊवातीपासूनच काही तरी बनायचे ही जिद्द त्याने मनात ठेवली. आता त्याने बऱ्यापैकी जम बसविला असून अभिनय आणि कास्टिंग क्षेत्रातही आपले नाव कमावले आहे. त्याने या क्षेत्रात ओळखी बनविल्या असून त्यामुळेच अनेक ठिकाणाहून कामेही चालून येतात, असे तो सांगतो. या क्षेत्रात व्यसन न करता राहिल्यास अधिक काळ टिकू शकतो, असेही तो सांगतो.
विविध चित्रपटात काम
अजितने ‘शेर शिवराय’ या चित्रपटात सरदारचे काम केले आहे. पावनखींड या चित्रपटात मुस्लीम सरदार, विक्रम वेदा या हिंदी चित्रपटात छपरी बॉय, प्रेमांत या मराठी चित्रपटात सेकंड लिड हिरोचे काम केले आहे. तर बदीर, स्वराज्य संविधान, किंगमेकर यासह इतर चित्रपटातही काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. त्याने बेळगाव येथेही एक गाणे चित्रित केले असून त्याची चर्चाही जोरदार आहे. याचबरोबर अनिर्वान (रावनावर आधारित) ही वेबसीरीजही त्याने तयार केली आहे. लवकरच ती अपलोड होईल, असे तो सांगतो. आपल्या गावाकडील जीवन आणि शहरी जीवन याबद्दल त्याने मोठा बदल असल्याचे सांगत तेथील जीवन हे धावपळीचे आहे. मीही आता तेथील धावपळीच्या जीवनातच रमलो आहे. अनेक कामे चालून येत आहेत. तर पुणे येथील एका लोकप्रतिनिधींच्या मुलासोबत मिळून नवीन चित्रपट निर्माण करण्यासाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून माझी निवड झाली आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी मी या व्यवसायात गुंतल्याचे तो सांगतो.
संधीचे सोने करू
खानापूर तालुक्यातून एका दुर्गम गावातून त्याने आपला प्रवास करत सध्या तो बिग बॉसच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे. त्याने याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असून मराठी बीग बॉसमध्ये तो भाग घेणार आहे. सध्या यासाठीची सर्व माहिती त्याने दिली आहे. जर यामध्ये आपल्याला संधी मिळाली तर मी त्याचे सोने करू, असे त्याने सांगितले.
कामावर प्रेम आणि निष्ठा ठेवा
कोणतेही काम घाईगडबडीमध्ये करू नका. त्या कामावर प्रेम आणि निष्ठा ठेवा. महत्त्वाचे म्हणजे संयम असल्यास तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. याचबरोबर व्यसनापासून दूर रहा आणि प्रामाणिकपणे काम करत रहा, असा संदेशही त्यांनी तऊणांना दिला आहे.