दिनांक 17-07-2022
मेष
काहीतरी नवीन बातमी तुम्हाला कळल्यामुळे तुम्ही पुढच्या योजना आखण्यात करता सज्ज व्हाल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल. या आठवडय़ामध्ये काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे पूर्ण विचारांती काम करणे योग्य ठरेल. पैशांच्याबाबतीत थोडी निराशा हाती लागू शकते. सप्ताहाच्या शेवटी तुम्ही मित्रांसोबत किंवा घरच्यांसोबत मौजमजा कराल.
हळदीची गाठ जवळ ठेवावी.
वृषभ
या आठवडय़ामध्ये तुम्ही एखाद्या समारंभामध्ये भाग घेऊ शकता. त्या समारंभात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. काही बाबतीत संभ्रम होऊ शकतो. योग्य आणि अयोग्य याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्यावरून फायदा किंवा नुकसान अवलंबून असेल. जुन्या समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे. नवीन हाती घेतलेल्या कामात यश नक्की मिळेल. प्रयत्नात कसूर करू नये.
लाजाळूची पाण्याजवळ ठेवावीत
मिथुन
या आठवडय़ामध्ये तुम्हाला विवेकपूर्ण आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज आहे. असलेल्या ताणतणावाला सोबत घेऊन कामे पूर्ण होणार नाहीत. स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवला तर प्रत्येक कामात यश मिळेल. तुमचे शुभचिंतक तुमच्या प्रत्येक कामात मदत करतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. महिला वर्गाने आपली इमेज सांभाळणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये वृद्धी होईल.
सुलेमानी हकीक की जवळ ठेवावा
कर्क
काहीतरी नवीन आणि चांगले घडणार आहे यावर विश्वास ठेवा. त्याकरता लागणारे प्रयत्न आणि उत्साह तुमच्याकडून कमी पडणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे जाण्याची वेळ आहे. कित्येक दिवस तुम्ही ज्या संधींची वाट बघत होता त्या संधी स्वतःहून चालत तुमच्याकडे येतील. प्रेमींना अनुकूल काळ आहे. व्यवसायात दक्ष राहण्याची गरज आहे. घरगुती वादांना वाढू देऊ नका.
तिळेल दान द्यावे
सिंह
कित्येक बाबतीमध्ये एकटेपणा जाणवेल. जवळच्या व्यक्तीसुद्धा तुमच्या मनातली गोष्ट समजू शकत नाहीत त्याची खंत वाटेल. परंतु विचारांना पॉझिटिव्ह ठेवून आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे योग्य ठरेल. काही बाबतीमध्ये बदल घडतील. काही नात्यांमध्ये दूरता येईल पण हे भल्या करताच आहे हे समजून घ्या. व्यावसायिक संबंधांमध्ये वाढ होई.ल पैशाची येणी येतील.
जखमी जनावरांना मदत करावी
कन्या
आठवडा हा बऱयाच बाबतीमध्ये गुंतागुंत वाढवू शकतो. अशावेळी स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून त्याप्रमाणे वागणे क्रमप्राप्त ठरेल. एखाद्या गोष्टीला तुमच्यापासून लपवण्यात सुद्धा येऊ शकते किंवा तुमच्या कडून महत्त्वाच्या गोष्टीकडे डोळेझाक होऊ शकते त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. स्वप्नपूर्ती करता कठोर प्रयास करावे लागतील. येणाऱया काळामध्ये सुख-समृद्धी मध्ये वाढ ही नक्की.
गरजूला अन्नदान करावे
तूळ
या आठवडय़ामध्ये तुमच्या निर्णय घेण्यावर ती बऱयाच गोष्टी अवलंबून असतील. काही पेचप्रसंगातून मार्ग काढावा लागेल आणि हा पेच जवळच्या माणसांमुळे निर्माण होईल. काही वेळा तुमच्या मनात हा हि विचार येईल की आपण करतोय ते योग्य आहे का? अशावेळी आत्मपरिक्षण करणे गरजेचे ठरेल. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱया लोकांकरता अनुकूल काळ आहे. व्यवसायामध्ये वृद्धि होईल.
हिरव्या रंगाची काचेची घोटी जवळ ठेवावी
वृश्चिक
कौटुंबिक कलह किंवा व्यवसायामध्ये वादाचे प्रसंग जर आले तर सगळय़ा प्रकारची कटुता विसरून मार्ग काढावा लागेल अन्यथा काही वाद विकोपाला जाण्याची शक्मयता आहे .नवीन कामे हाती येतील. नवीन प्रोजेक्ट सुरू होतील आणि त्यामुळे समाधान मिळेल. याचबरोबर हेही ध्यानी ठेवले पाहिजे ही प्रयत्नांना पर्याय नाही, संघर्ष हा ठरलेला आहे. याकरता मानसिक तयारी ठेवणे गरजेचे असेल. मसूर दान द्यावे
धनु
या आठवडय़ामध्ये तुम्ही बऱयाच गोष्टींची तयारी कराल. त्यातील काही बाबतीमध्ये यश मिळेल तर काही बाबतीमध्ये अपयश मिळाल्यामुळे डिप्रेशन येऊ शकते. याकरता मानसिक संतुलन मजबूत ठेवणे गरजेचे आहे. इतके दिवस ज्या गोष्टींच्या पूर्तते बद्दल तुम्ही स्वप्न? पाहात होता त्याकरता मेहनत करण्याची वेळ आली. आहे यश तुमचेच आहे हे ध्यानी ठेवा. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी आणि नवीन हुद्दा मिळू शकतो.
तुळशी च्या झाडाला पाणी घालावे
मकर
या आठवडय़ात संदेश असा आहे ही तुम्हाला कित्येक बाबतीमध्ये न्याय मिळेल ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. पूर्वी झालेल्या अन्यायाला विसरून नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे. काही घटना अशा घडतात कि ज्यामध्ये तुमचा तोल जाऊ शकतो त्यामुळे भावनिक संतुलन ठेवण्याकडे लक्ष द्या. लक्षात घ्या की संघर्ष अजून संपला नाही आहे. धनप्राप्ती आणि आरोग्याच्या बाबतीत सावधान राहण्याची गरज आहे.
पाच हळकुंड जवळ ठेवावे
कुंभ
हा आठवडा रोमांचक असेल. बऱयाच गोष्टींमध्ये एक्साईटेड असाल. तुम्हाला उपहार मिळू शकतो. काही संधी प्राप्त होतील पण येथे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही अल्प कालावधी चा फायदा न बघता दीर्घकालीन लाभा कडे लक्ष द्यावे. हा मोह टाळता आला तर बऱयाच संधींना प्राप्त कराल. पैशांच्या देवाणघेवाणीतून नफा होईल. मनासारख्या घटना घडतील. पार्टनर वर विश्वास ठेवावा.
अशोकाचे पान जवळ ठेवावे
मीन
आर्थिक दृष्टय़ा जरी तुम्ही समाधानी असाल. तरीसुद्धा जवळच्या लोकांपासून दुरावा संभवतो. याचबरोबर एखादे जुने वैरत्व मिटवायचा प्रयत्न करा. काही बाबतीमध्ये निराशा हाती येईल पण मनाला उदास न होऊ देता प्रयत्नांची कास सोडू नका. काही काळानंतर यश तुमचेच आहे हे लक्षात घ्या. कामाच्या ठिकाणी लोकांची कारस्थाने वाढतील. घरच्या लोकांची साथ मिळेल.
पिंपळा खालची माती घरी ठेवावी
टॅरो उपाय
काहीवेळा असा प्रसंग येतो की आपल्याला पैशांची अचानक गरज लागते अशावेळी बावरून न जाता बाकीच्या प्रयत्नांबरोबर हा प्रयोगही करून बघा. एका स्टीलच्या प्लेटमध्ये हळदीचा थर लावावा. त्यावर जितकी रक्कम हवी आहे ती रक्कम दालचिनीच्या काडीने लिहावी. वर आपले पूर्ण नाव लिहावे. दालचिनीची काडी उजव्या दिशेला प्लेटमध्ये ठेवावी आणि ही प्लेट देवाजवळ ठेवावी.