विकताच होणार अब्जाधीश
एक 9 वर्षीय मुलगी समुद्राच्या किनाऱयावर फिरत असताना तिला मौल्यवान गोष्ट सापडली आहे. अमेरिकेतील 9 वर्षीय मौली सॅम्पसन हीला दीर्घकाळापासून शोध असलेली गोष्ट सापडली आहे. ही गोष्ट एखादी खेळणी दिसून 5 इंचाचा मेगालोडन शार्क दात आहे.
मौलीला जीवाश्म विज्ञान अत्यंत आवडते, ती मेरीलँडच्या कॅल्वर्ट बीचवर जीवाश्मांची शिकार करण्यासाठी पोहोचली होती. तिने नाताळाच्या दिनी स्वतःच्या हाताच्या आकाराच्या एका दाताचा शोध लावला आहे. यासंबंधी मौलीची आई एलिसिया सॅम्पसन यांनी फेस्टबुक पोस्टवर माहिती दिली आहे. मौली आणि तिची बहिण नताली दोघीही अनेकदा समुद्रकिनाऱयावर जात शार्कसारख्या माशांच्या दातांचा शोध घेत असतात. समुद्र किनाऱयावर शोध घेत असताना या बहिणी स्वतःचे वडिल ब्रूस सॅम्पसन सोबत होत्या असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दात आणि अन्य जीवाश्मांचा शोध घेत परिवारासाठी त्यांचा वापर करून एक हार तयार करण्याची मौलीची इच्छा होती. तिने जीवाश्मांच्या दातांचा एक संग्रहच तयार केला आहे. मौलीच्या शोधाला कॅल्वर्ट सागरी संग्रहालयात आणल्यावर तो आता विलुप्त झालेल्या मेगालोडन शार्कचा दात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रजातीचा शार्कमास सुमारे 3.5 दशलक्ष वर्षांपूर्वी विलुप्त झाला होता. हा एका 45-50 फूट लांबीच्या शार्कचा दात असावा असे कॅल्वर्ट मरीन म्युझियमधील तज्ञ स्टीफन गॉडप्रे यांनी सांगितले आहे. हा दात विकला गेल्यास ही मुलगी अब्जावधी ठरू शकते असे त्यांनी म्हटले आहे.