क्लब रोडवरील चेंबरमध्ये अडकले रेडकू
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेकांचा बळी गेला आहे. अनेक कामे अर्धवट असल्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. ही मालिका सुरूच आहे. बुधवारीही क्लब रोड येथे गटारीच्या चेंबरवर असलेल्या लोखंडी रॉडमध्ये एक रेडकू अडकून जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात होऊन सात वर्षे उलटली तरी अद्याप कामे पूर्ण नाहीत. काही ठिकाणी गटारींवर चेंबरच नाही तर काही ठिकाणी चेंबर असूनही धोकादायक आहेत. त्यामुळे फुटपाथवरून ये-जा करणे अवघड झाले आहे. बुधवारी क्लब रोडवरून रेडकू जात असताना त्याचे चारही पाय त्या चेंबरमध्ये अडकले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. गवळय़ांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्मय झाले नाही. शेवटी लहान पेन बोलावून घेऊन चेंबर बाजूला काढण्यात आले. त्यामुळे त्या रेडकाची सुटका झाली. त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेकांचा बळीदेखील गेला आहे. अनेक जण जखमीही झाले आहेत. मंडोळी रोड, मध्यवर्ती बसस्थानकशेजारी दोघांचा मृत्यू झाला होता तर बरेच जण जखमी झाले आहेत. तरीदेखील स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना आणि कंत्राटदारांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. शहरासह उपनगरांमध्ये अनेक कामे अर्धवट आहेत. त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.