लोणावळा / वार्ताहर :
The missing link tunnel on the expressway will be completed by the end of 2023 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगदा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार असलेला प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.
लोणावळा ते खालापूर दरम्यान होत असलेल्या या अत्याधुनिक बोगद्याच्या कामाची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी करून प्रकल्पाची माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, लोणावळा धरणाच्या खाली साधारणतः 500 ते 600 फूट अंतरावरून हा बोगदा गेला आहे. या बोगद्यांमध्ये सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली असून, बोगद्याला सिमेंट कोटिंग, फायर मॉनिटररिंग, रॉक बोल्टिंग, हायप्रेशन स्वयंचलित अग्नीशमन यंत्रणा बसविण्यात आली असून, प्रत्येक 300 मीटर अंतरावर आपत्कालीन बाह्य रस्ता बनविण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे हे अंतर साधारणतः अर्धा तासाने कमी होणार असल्याने पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी हा बोगदा वरदान ठरणार आहे.
अधिक वाचा : साखर कारखान्यांनी खासगी काट्यावर वजन केलेला ऊस नाकारल्यास कारवाई
आशिया खंडातील हा सर्वात रुंद व 8 किमी अंतर असलेला बोगदा भविष्यात पतदर्शी प्रकल्प ठरेल, असे शिंदे म्हणाले. याबरोबरच कोविड काळात जी कामे थांबली होती, रखडली होती, ती देखील आम्ही वॉर रुममधून हाती घेतली असून, ती लवकरच पूर्णत्त्वाला जातील. महाराष्ट्रातील रोजगाराचे प्रकल्प इतर राज्यांमध्ये जात आहेत, या प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले, कोणताही प्रकल्प एका दिवसात येतो व जातो असे होत नाही. मागील सरकारच्या काळात हे प्रकल्प आले, मात्र त्यांनी योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते इतर राज्यात गेले आहेत.