दक्षिण आफ्रिकेत जीवाश्म तज्ञांना जगातील सर्वात जुन्या दफनभूमीचा शोध लागला आहे. माणसांना दफन करण्याची ही सर्वात जुनी ज्ञान जागा असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. जटिल वर्तनासाठी अक्षम मानले जाणारे हे मनुष्य होते, असेही सांगण्यात आले. प्रसिद्ध जीवाश्म तज्ञ ली बर्जर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन पूर्ण करण्यात आले आहे. जोहान्सबर्गमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळानजीक लागलेला शोध थक्क करणारा आहे. ही दफनभूमी होमो नलेदीची असून तो झाडावर चढणारा आणि पाषाण युगातील मानव होता असे संशोधकांकडून सांगण्यात आले.
100 फूट खोल दफनभूमी
पाषाणयुगात मनुष्य राहत असलेल्या गुहेत ही दफनभूमी आढळून आली आहे. ही दफनभूमी सुमारे 100 फूट खोलवर जमिनीत गाडली गेलेली आहे. ही दफनभूमी सुमारे 1 लाख वर्षापूर्वी तयार करण्यात आली असावी असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हा निष्कर्ष मानव विकासाच्या वर्तमान धारणेला आव्हान देणारा आहे. सर्वसाधारणपणे जटिल कृती म्हणजे मृतदेह दफन करण्यासाठी विकसित मेंदू असलेल्या मनुष्यांची गरज होती असे सर्वसाधारणपणे मानले जाते.
मध्यपूर्व अन् आफ्रिकेतही शोध
यापूर्वी मध्यपूर्वेत आणि आफ्रिकेत मानवांची सर्वात जुनी दफनभूमी आढळून आली होती. ती सुमारे 1 लाख वर्षे जुनी होती. होली नलेदीचा शोध सध्याचा माणूस विशेष नसल्याचे दर्शवून देतो. होमो नलेदी मानवी संस्कृतीचे असे रुप होते जे माकड अन् आधुनिक मानवांमधील साखळी मानले जाते. होमो नलेदी काळात मानवी मेंदूचा आकार लहान होता, असे सांगण्यात येते.