दोन कैदी गंभीर जखमी : रुग्णालयात दाखल
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील तिहार तुऊंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये सोमवारी पुन्हा एकदा संघर्ष झाला. कैद्यांमधील या हाणामारीत दोन कैदी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना कारागृह क्रमांक-1 मध्ये घडल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी 2 मे रोजी दिल्लीतील तिहार तुऊंगात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीच्या हाय-प्रोफाईल आणि सुरक्षित तिहार तुऊंगात कैद्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्याचे सांगण्यात आले. येथे कैद्यांच्या दोन गटांमध्ये टोळीयुद्ध झाले आहे. या हल्ल्यात दोन कैदी गंभीर जखमी झाले आहेत. कारागृहातील या चकमकीनंतर तुऊंगात मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून जखमींना तातडीने डीडीयू ऊग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन्ही गटातील कैद्यांवर गंभीर गुह्यांचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तिहार तुऊंगात दोन गट पूर्वीपासूनच पहायला मिळत आहेत. सोमवारी त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. कैद्यांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेनंतर कारागृहात खळबळ उडाली आहे. एकमेकांशी भिडलेले कैदी वेगवेगळ्या टोळ्यांशी संबंधित आहेत. तिहार मध्यवर्ती कारागृहातील तुऊंग क्रमांक 1 मध्ये सोमवारी झालेल्या चकमकीनंतर तिहार कारागृह प्रशासन आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची 2 मे रोजी हत्या
यापूर्वी 2 मे रोजी तिहार तुऊंगात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी निर्घृण हत्या केली होती. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. गोगी टोळीच्या कार्यकर्त्यांवर टिल्लू ताजपुरिया याच्या हत्येचा आरोप होता. दरम्यान, तिहार तुऊंगात दोन कैद्यांच्या गटांमध्ये झालेल्या या ताज्या हाणामारीबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जखमींवर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस दोघांचे जबाब घेऊन हल्ल्याचे कारण शोधत आहेत.