मनपा आयुक्त लक्ष देणार का? नागरिकांतून प्रश्न
बेळगाव : महापालिका आयुक्तांच्या शासकीय घरासमोरील उद्यानाची अवस्था दयनीय झाली आहे. आयुक्त शहर स्वच्छ करण्यासाठी तसेच सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र सदाशिवनगर येथील या उद्यानांमधील मुलांना खेळण्यासाठी असलेले साहित्य खराब झाले असून तुटून पडले आहेत. त्याकडे महापालिका आयुक्त लक्ष देणार का? असा प्रश्न पालक करत आहेत. सदाशिवनगर येथील या उद्यानामधील पाळणे, घसरगुंडी पूर्णपणे खराब झाली आहे. तर कचरादेखील मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्या उद्यानाची व्यवस्था करण्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. बरेच पालक मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी नेत आहेत. मात्र त्यामधील साहित्यच खराब झाले आहे. क्लबरोडपासून सदाशिवनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून हे उद्यान आहे. त्यामध्ये कोणत्याच प्रकारची इतर झाडे किंवा खेळण्याच्या वस्तू नाहीत. केवळ पाळणा आणि घसरगुंडी आहे. तीही खराब झाली आहे. झाडांचा पालाही मोठ्या प्रमाणत पडून आहे. त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील स्वच्छता करून दुसरे साहित्य आणून बसवावे, अशी मागणी होत आहे.