ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आज सकाळी नेपाळमधून उड्डाण केलेलं तारा एअरचं विमान बेपत्ता झालं आहे. उड्डाणानंतर अवघ्या 15 मिनिटात या विमानाचा संपर्क तुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विमानातून 22 प्रवाशी प्रवास करत होते. त्यामध्ये 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांचाही समावेश आहे.
नेपाळच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या डबल इंजिनच्या विमानाने आज सकाळी 9.55 ला पोखरा येथून जोमसोमसाठी उड्डाण केले होते. जॉमसॉमच्या हवाई हद्दीत मुस्तंग येथे हे विमान शेवटचं पाहिलं गेलं होतं. त्यानंतर ते डायव्हर्ट झालं. अवघ्या 15 मिनिटांत या विमानाचा संपर्क तुटला. या विमानाशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून, नेपाळच्या गृहमंत्रालयाकडून दोन खासगी हेलिकॉप्टर शोधकार्यासाठी पाठविण्यात आली आहेत. नेपाळच्या सैन्याकडूनही शोध कार्य केलं जात आहे.
विमानात चार भारतीयांचा समावेश
या विमानात एकूण 22 प्रवासी असल्याचं स्पष्ट झालं आहे. यात एकूण चार भारतीय प्रवाशांचा समावेश आहे. तर तीन जपानी प्रवाशी असून, अन्य 15 प्रवाशी नेपाळमधीलच आहेत. त्यामध्ये पायलट आणि विमानातील क्रू मेंमर्सचाही समावेश आहे.