आक्षेप, हरकती 7 दिवसात नोंदविण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
मतदान केंद्राची प्रारुप यादी (Anexure1)व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http//kolhapur.gov.in/ या संकेतस्थळावर व जिल्हा निवडणूक शाखा, कोल्हापूर, मतदार नोंदणी अधिकारी तसेच सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या नोटीस बोर्डवर जाहीररीत्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सुचना, हरकत किंवा आक्षेप नोंदवायचा असल्यास त्यांनी 7 दिवसांच्या आत निवडणूक विभागाकडे नोंदवावा, असे नमूद बदलाचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडून मंजूर झाल्यास एकत्रितरीत्या प्रसिद्ध होण्राया मतदान केंद्राच्या यादीमध्ये बदल अंमलात येतील. या आधारे मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनादेखील अस्तित्वात येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी सोमवारी कळविले आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 (अर्हता दिनांक 1 जानेवारी 2024 वर आधारित) मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम जिह्यातील (271- चंदगड, 272- राधानगरी, 273-कागल, 274 -कोल्हापूर दक्षिण, 275-करवीर. 276- कोल्हापूर उत्तर 277- शाहूवाडी, 278- हातकणंगले, 279-इचलकरंजी, 280- शिरोळ) या एकूण 10 विधानसभा मतदारसंघांत राबविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वपुनरीक्षण उपक्रमाचा भाग म्हणून दि. 29 सप्टेंबर 2023 पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे.
जिह्यातील एकूण 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्रांच्या स्थानातील बदलाचे, विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रातील 1 हजार 500 मतदारांपेक्षा अधिक क्षमता होण्राया मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होण्राया मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावातील बदल हे सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे ही पत्रकात नमुद केले आहे.