2021 मध्ये मुलीवर झाला होता बलात्कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत 16 वर्षीय मुलीने एका महिलेवर गोळी झाडली आहे. गोळी लागल्याने संबंधित महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेच्या अल्पवयीन मुलाने या मुलीवर 2021 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. याचमुळे पीडितेने या महिलेवर गोळीबार केला आहे. नवी दिल्लीतील भजनपुरा भागात 50 वर्षीय महिला दुकान चालविते. पीडित मुलीने या दुकानात जात महिलेवर गोळी झाडली आहे. या घटनेनंतर मुलीला ताब्यात घेण्यात आले तर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेच्या मुलाने 2021 मध्ये मुलीवर बलात्कार केला होता. पीडितेने संबंधित मुलाच्या विरोधात गुन्हाही नोंदविला होता.