गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सन्मान
सावंतवाडी /प्रतिनिधी –
सद्याचे युग हे अत्यंत स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जीवाचे रान करतांना दिसतो. अशावेळी आजच्या एकंदरीत धावपळीत आणि बाहेरच्या प्रचंड कलुषित वातावरणात आदर्श अशा संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच शिक्षक, पालक यांच्यासाठी खरे आव्हान आहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संस्थाध्यक्ष विकास सावंत यांनी केले.सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी आयोजित इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सावंत होते.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व माजी मुख्याध्यापक व्ही. बी.नाईक, शालेय समिती अध्यक्ष प्रा. डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक व संस्था सदस्य अमोल सावंत, चं. मु. सावंत, संदीप राणे, प्रा. सतीश बागवे, माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत आदी उपस्थित होते.दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते एस.एस.सी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनुक्रमे वर्धा तानाजी सावंत, आदिती दिनेश चव्हाण, समीर मयुरेश पटवर्धन, अमृता मनोज बिले, राहुल झिलू गावडे, मयुरेश मंदार पटवर्धन, तेजस देवदास कोरगांवकर, सिद्धार्थ सुधाकर आडेलकर, सिद्धी एकनाथ उपरकर, मयुर मोहन पवार, अक्षय हरिश्चंद्र बंड, सानिया भालचंद्र सबनीस, शत्रुघ्न दिलीप नाईक, सिद्धी संतोष राऊळ, रसिका वारंग, पर्जन्य सावंत तर एच. एस. सी परीक्षेत कला शाखेतून अनुक्रमे वैष्णवी श्रीपाद डेगवेकर, ईशा चंद्रशेखर प्रभू, यशदा शरद शिरोडकर, विज्ञान शाखेतून अनुक्रमे दिशा राजेश गुडेकर, युगा विष्णू देसाई, सिद्धी रामचंद्र मांजरेकर, वाणिज्य विभागातून गायत्री सुजित कोरगांवकर, मानसी रघुनंदन माळकर, दर्शन दिगंबर सामंत. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंटमधून ओजस विनायक परब, अक्षता सिताराम गावडे, सना इम्तिहाज शेख तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधून अनुक्रमे भिकाजी राजन केदार, न्हानू मोहन सावंत, अनिकेत दाभोळकर याबरोबर वेगवेगळ्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी मानसी माळकर, युगा देसाई, श्रीराम वालावलकर, सोनम ढवळे, दीपिका राऊळ, ईशा प्रभू, रोहित कालवणकर या गुणवंतांना पालकांसोबत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.