गिनिज बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नाव नोंद
स्वत:च्या कामगिरीद्वारे नाव कमाविलेल्या लोकांची संख्या जगात कमी नाही. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा लोकांच्या कामगिरींनी भरून गेले आहे. यातील अनेकांची कामगिरी जाणून घेतल्यावर थरकाप उडतो. अलिकडेच एक असाच विश्वविक्रम फ्रान्सच्या जोनाथन वेरोने स्वत:च्या नावावर केला आहे. स्वत:ला आग लावून घेत त्याने सर्वाधिक वेगाने 100 मीटरची शर्यत पूर्ण केली आहे. यादरम्यान त्याने ऑक्सिजन सिलिंडरचीही मदत घेतलेली नाही.
गिनिज बुकने याची माहिती शेअर केली आहे. 39 वर्षी फ्रेंच फायरफायटर जोनाथन वेरोने ऑक्सिजन सिलिंडरशिवाय सर्वाधिक अंतराचे फूल बॉडी बर्न रन पूर्ण करत जगाला चकित केले आहे. सुरक्षात्मक सूट परिधान करत जोनाथनने आगीच्या ज्वाळांमध्ये वेढला गेलेला असूनही 272.25 मीटरची शर्यत पूर्ण केली आहे. यापूर्वीचा अशाप्रकारचा विक्रम 204.23 मीटर शर्यतीचा होता. याचबरोबर जोनाथनने ऑक्सिजन सिलिंडरल्शवाय सर्वात वेगाने फूल बॉडी बर्न 100 मीटर स्प्रिंटचा विक्रमही मोडीत काढला आहे. या कामगिरीला त्याने केवळ 17 सेकंदांमध्ये पूर्ण केले आहे.
जोनाथनने या विक्रमी कामगिरीचे छायाचित्र शेअर केले आहे. आतापर्यंत पाहिले गेलेल्या सर्वोत्तम छायाचित्रांपैकी हे एक असल्याचे गिनिज बुकने म्हटले आहे. ऑक्सिजन सिलिंडरशिवाय सर्वाधिक अंतराचे फूल बॉडी बर्न रनचा विक्रम अत्यंत अवघड आहे. तरीही हा विक्रम 2009 पासून आतापर्यंत 7 वेळा मोडण्यात आला आहे. 14 वर्षापूर्वी ब्रिटनच्या जोनाथन कीथ माल्कनने सर्वप्रथम अशाप्रकारचा विक्रम नोंदविला होता.
फ्रान्समधील जोनाथन हा फायरफायटर असण्यासह एक व्यावसायिक स्टंटमन देखील आहे. मला नेहमीच आगीशी खेळण्याचा छंद होता. याचमुळे बालपणापासून मी आगीशी खेळत आलो आहे. माझा बहुतांश वेळ आग विझविण्यात किंवा फायर शोमध्ये भाग घेण्यात जातो. दरवेळी नवा विक्रम नोंदविणे मला आवडते असे जोनाथन यांनी म्हटले आहे.