प्रतिनिधी / बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी खटला लढण्यासाठी कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करणार असल्याची माहिती दिली.
सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकार आक्रमक झाले होते. बेळगावमधील मराठी भाषिकांचा महामेळावा होऊ दिला नाही. त्यावर आता शिंदे- फडणवीस सरकारने सीमाप्रश्नी विधानभवनात ठराव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ठरावाचे वाचन केले. त्यानुसार कर्नाटक सरकारला जशास तसे उत्तर देणारा ठराव विधिमंडळात मंजूर करण्याची घोषणा सरकारने केली होती. आज हा ठराव एकमताने मंजूर झाला आहे.