प्रतिनिधी
बांदा
विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या प्रशालेतून परीक्षेसाठी एकूण ५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रशालेतून प्रथम सानिका सोनू दळवी (९३.२० टक्के), द्वितीय सानिका लक्ष्मण दळवी (९०.४० टक्के), तृतीय अनुजा विनायक दळवी (९०.८० टक्के). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संभाजी दळवी,सचिव सुर्यकांत दळवी, खजिनदार चंद्रकांत दळवी, स्कुल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, स्कुल कमिटी खजिनदार सुरेश सावंत माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष रुपेश परब, प्रशालेचे मुख्याध्यापक,शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.