न्हावेली / वार्ताहर
तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.२४ टक्के लागला आहे . शोनान श्याम परब ७५.३३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आली . दत्तप्रसाद आपा गुळेकर ७४.५० टक्के गुण मिळवून व्दितीय तर विनय लक्ष्मण शेळके ६९. ८३ टक्के गुण मिळवून तृतीय आला . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विष्णु पेडणेकर, मुख्याध्यापक प्रतापराव देसाई , खजिनदार डॅा. भालचंद्र कांडरकर, सीईओ. श्रीकृष्ण पेडणेकर, तसेच सर्व संस्था पदाधिकारी शिक्षकेत्तर आणि कर्मचारी व पालक संघाने अभिनंदन केले