पुलाच्या रस्त्यावरील सळ्या आल्या बाहेर : प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
वाघवडे-देसूर पुलाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर मोठमोठे ख•s पडलेले आहेत. या पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना अडचण निर्माण झाली आहे. वाहतुकीसाठी या पुलाजवळील रस्ता धोकादायक बनला आहे. प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व स्थानिक नागरिकांतून होऊ लागल्या आहेत. वाघवडे-देसूर हा संपर्क रस्ता या भागातील वाहनधारकांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून रोज वाघवडे, संतीबस्तवाड, झाडशहापूर, मच्छे, पिरनवाडी, किणये या भागातील वाहनधारकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते.
गेल्या सहा-सात वर्षांपूर्वी मुंगेत्री नदीवरील हे पूल बांधण्यात आले होते. मात्र पुलावरील रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. या ठिकाणी मोठमोठे ख•s पडलेले आहेत. तसेच लोखंडी सळ्या बाहेर दिसत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी पडलेले आहेत. किरकोळ अपघाताच्या घटना घडून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याआधीच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. खानापूर भागातील वाहनधारक शिनोळीला जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून देसूर ते वाघवडे रस्त्याचा उपयोग करतात. त्या रस्त्यावरून शिनोळी भागात जाणाऱ्या वाहनांचीही रोज वर्दळ असते. त्यामुळे बेळगाव सीमाभाग व चंदगड भागातील वाहनधारकांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पुलावरील हा रस्ता होणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा रस्ता
वाघवडे व देसूर भागातील वाहनधारकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून वाहनधारकांसह शेतकरी वर्गही रोज ये-जा करतात. वाघवडेतील बरीचशी शेती या रस्त्याच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वाहतूकही रस्त्यावरून होत असते. पुलावरील रस्त्याच्या ठिकाणी मोठमोठे ख•s पडलेले आहेत. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करावी व याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
– एम. टी.आंबोळकर, वाघवडे