क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
‘रोटरी रन रेन’ची आठवी आवृत्ती रविवार, 31 जुलै रोजी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या बांबोळीतील ऍथलेटीक स्टेडियमवर होणार आहे. रोटरी क्लब ऑफ पर्वरीद्वारे आयोजित या कार्यक्रमात 2, 5, 10 व 21 किलोमीटर अंतराच्या शर्यती होईल.
10 आणि 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉनला वेळेची मर्यादा असणार आहे. 5, 10 व 21 किलोमीटर शर्यतीतील सहभागींना पदक, एक टी-शर्ट देण्यात येईल तर 2 किलोमीटर धावणाऱया धावपटू व चालणाऱयांना पदक देण्यात येईल.
21 किलोमीटर धावणारे धावपटू बांबोळीतील गोमेकॉसमोर धावण्यास सुरूवात करतील व मिरामार समुद्र किनाऱयावरील वर्तुळापर्यंत जातील आणि गोवा विद्यापीठाच्या रस्त्याने परततील. इतर विभागातील धावपटू गोमेकॉसमोरील ऍथलेटीक स्टेडियमपासून गोवा विद्यापीठ रस्त्यावरील विशिष्ट पॉइंटपर्यंत धावतील व सुरू झालेल्या पॉइंटवर परत येतील.