रत्नागिरी प्रतिनिधी
पनवेल जवळील कळंबोळीत मालगाडीचे डबे घसरल्याचा फटका कोंकण रेल्वे मार्गावरील गाडयांना बसला असून गणपती निमित्ताने सोडण्यात आलेल्या अतिरिक्त गाड्यामुंळे विस्कळीत झालेले कोंकण रेल्वेचे वेळापत्रक आज पुरते कोलमडले.
पनवेल दिवा रेल्वे मार्गावर मालगाडीला अपघात झाल्याने कोंकण रेल्वे मार्गावरुन धावणा-या अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या.
दुपारी २वा ५२ मिनिटात पनवेल ला पोहोचणारी १६३४६ नेत्रावती एक्सप्रेस सुमारे ८ तास उशीराने धावत आहे. ०९०१० सावंतवाडी मुंबईसेंट्रल गणपती विशेष गाडी ६ तास; दिल्लीला जाणारी १२४३१ त्रिवेंद्रम राजधानी ५ तास; मडगाव मुंबई ०११५२ गणपती विशेष ७ तास; मडगांव मुंबई वंदे भारत २ तास; मांडोवी एक्सप्रेस ४ तास; जनशताब्दी २ तास; एर्नाकुलम ओखा ५ तास; सावंतवाडी दिवा ५ तास उशीराने धावत आहेत.
यामुळे गणेशोत्सव आटोपून गावाकडुन मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.