ब्यूटी ब्रँडच्या पोस्टरवर झळकली
मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीने लक्झरी ब्युटी ब्रँड ‘फॉरेस्ट इसेंशियल्स’ची नवी पॅम्पेन ‘द युवती कलेक्शन’चा चेहरा होत देशाला गौरवान्वित केले आहे. मलीशा खारवा असे नाव असलेल्या या मुलीला सर्वप्रथम हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅनने शोधले होते. हॉलिवूड अभिनेत्याने गो फंड मी पेजही तयार केले होते. मलीशाला आता प्रेमाने ‘झोपडपट्टीतील राजकन्या’ म्हटले जात आहे. फोटो शेयरिंग अॅपवर 2 लाखाहून अधिक फॉलोअर्ससोबत तिचे एक इन्स्टाग्राम पेज देखील आहे. रॉबर्ट हॉफमॅन यांनी निवड केल्यावर मलीशाने अनेक मॉडेलिंग करार स्वीकारले आहेत. ‘लिव्ह योर फेयरीटेल’ नावाचा एक लघुपटही केला आहे. लक्झरी ब्युटी ब्रँडकडून मलीशाची निवड करण्यात आल्याने झोपडपट्टीतील तिच्या मैत्रिणी अन् कुटुंबीय आनंदीत झाले आहेत. फॉरेस्ट इसेंशियल्सने सामाजिक पुढाकाराच्या स्वरुपात मलीशाची निवड केली आहे. तिच्या व्हिडिओला 4 लाखाहून अधिक लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. मलीशा शाळेत जाते हे ऐकून आनंद झाला असे एका युजरने म्हटले आहे. जाहिरातींसाठी अभिनेत्रींना निवडण्याऐवजी कंपन्यांनी गरीब आणि वंचित मुलामुलींची निवड करावी असे अन्य युजरने नमूद केले आहे.