मागील आठ दिवसांपासून मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : अनगोळ चौथे रेल्वेगेट ते बेम्को नाक्यापर्यंत रस्त्याचा विकास करण्यात आला. या ठिकाणी एलईडी लाईट बसविण्यात आले. ते लाईट दिवसाही सुरूच ठेवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला आकर्षक असे शोभेचे पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र ते गेल्या आठ दिवसांपासून सुरूच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात दिवसाही उजेड पाडविण्यात येत असून विजेचा अपव्यय करण्यात येत आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरात विविध ठिकाणी अशाप्रकारे पथदीप सुरूच ठेवण्यात येत आहेत. यामुळे महानगरपालिकेला नाहक भुर्दंड बसत आहे. तेव्हा तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दिवसा सुरू असलेले पथदीप बंद करावेत, अशी मागणी होत आहे.