भारतासह 35 देशांचे वैज्ञानिक प्रयत्नशील
फ्रान्समध्ये दक्षिणेतील पर्वतीय भागांमध्ये जगभरात स्वच्छ आणि साफ ऊर्जा स्रोत मिळविण्यासाठी सूर्य निर्माण करण्याची तयारी सुरू आहे. या कामात भारतासह 35 देशांचे वैज्ञानिक सामील आहेत. हा सूर्य तयार झाल्यावर मानवी इतिहासातील ऊर्जेचे सर्वात मोठे संकट संपुष्टात येणार आहे. तसेच हवामान बदलाच्या संकटाला तोंड देणाऱया पृथ्वीला या संकटापासून काही प्रमाणात मुक्ती मिळणार आहे.
एक ग्रॅम आण्विक इंधन आणि 8 टन कच्चे तेलाइतकी ऊर्जा या सूर्यापासून मिळू शकणार आहे. वैज्ञानिक न्यूक्लियर फ्यूजनवर काम करत आहेत. न्यूक्लियर फ्यूजन प्रक्रिया खरा सूर्य आणि अन्य ताऱयांमध्ये नैसर्गिक स्वरुपात होत असते. परंतु ही प्रक्रिया पृथ्वीवर पार पाडणे सोपे नाही. न्यूक्लियर फ्यूजनद्वारे जीवाश्म इंधनाच्या उलट अमर्यादित ऊर्जा मिळते. यात ग्रीस हाउसचे उर्त्सजन होत नाही. तसेच यापासून किरणोत्सर्गी कचऱयापासून मुक्ती मिळण्याचीही अपेक्षा आहे.
फ्रान्सचे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रयोगात्मक रिऍक्टर पहिले असे उपकरण असेल, जे दीर्घकाळापासून फ्यूजन रिऍक्शन सुरू ठेवू शकेल. यात इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी आणि मटेरियलचे परीक्षण केले जाईल, ज्याचा वापर फ्यूजनद्वारे विजेचा व्यावसायिक उत्पादनासाठी करण्यात येणार आहे. याच्या प्रयोगाची पहिली कल्पना 1985 मध्ये समोर आली होती. याचे डिझाइन तयार करण्यात भारत, जपान, कोरिया, युरोपीय महासंघ आणि अमेरिकेची भूमिका आहे.