अतिरिक्त वित्त सचिव विकास गावणेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
जेम पोर्टल प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आहे. तसेच अतिशय कार्यक्षम पद्धतीने विपेत्यांना रक्कम प्रदान केली जाते, जेम पोर्टलमुळे विपेते आणि सरकार या दोन्हीसाठी सुलभता प्रदान होत असल्याने सरकार जेमला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. त्यामुळे गोव्यातील जीएसटी नोंदणीकृत व्यावसायकांनी जेमवर नोंदणी करावी, असे आवाहन गोवा सरकाच्या वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव विकास गावणेकर यांनी केले.
बुधवारी पणजीत आयोजित ‘जेम सेलर संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. पत्र सूचना कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास उपसंचालक गौतम कुमार, जेमच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे संचालक निशांत दीनगवाल, गोव्यातील व्यवसायप्रमुख केनेथ आल्फोन्सो आदींची उपस्थिती होती.
गोव्यातील ई-मार्केटप्लेसवरील विपेत्यांनी आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमामुळे राज्यातील जेम विपेत्यांना नवीन जेम वैशिष्टय़े आणि कार्यक्षमतेची ओळख करून घेता आली. या प्रारंभापासून आतापर्यंत 3.02 लाख कोटी किंमतीचे 1 कोटी व्यवहार सुलभ झाले आहेत. गोव्यातील 9417 विपेत्यांना या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 231.05 कोटी रुपये किंमतीच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ज्योती राव रेरापल्ली यांनी अनुभव कथन करताना या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. आपली कंपनी सेवा क्षेत्रातील असून मनुष्यबळ पुरवठा करतो. पेपरलेस काम असल्यामुळे व्यवसायात अतिशय सुलभता मिळाली आहे. आतापर्यंत आमच्या व्यवसायाने 2 कोटी रुपयांचा टप्पा गाठला, असे त्यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या निधी एन्टरप्रायजेसचे आशिष रंजन यांनी अनुभव कथन करताना, 2019 मध्ये जेम पोर्टवलर नोंदणी केल्यापासून देशभरातून कामाच्या ऑर्डर्स मिळत असून त्यामुळे आमची व्यवसायवृद्धी झाली आहे. तसेच जास्त बोलीदार असल्याने पारदर्शकताही वाढली आहे, असे ते म्हणाले.