प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात प्रशासक तथा मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच सायंकाळी चार वाजता ठराव समितीची सभा होणार आहे. या दोन्ही सभा किल्ले अजिंक्यताऱयाच्या रस्त्याच्या कामावरून गाजणार आहे, अशी जोरदार चर्चा बालिका वर्तुळात सुरू होती. सभेपूर्वीच त्या विषयावर हरकत घेण्यात आलेली आहे.
सातारा नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा मंगळवार दि. 28 रोजी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. प्रशासकीय राजवटीतील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामधून सातारकरांना नेमके काय मिळणार आहे. कर कशा पद्धतीने असणार आहे. कोणत्या बाबीला कशा तरतुदी केल्या आहेत. हे उद्या बजेटमध्ये समजणार आहे. याकडे सगळ्या सातारकरांच्या नजरा आहेत. तर त्याचबरोबर सायंकाळी पालिकेची ठराव समितीची सभा होणार आहे. त्यामध्ये 64 विषय अजेंडय़ावर घेण्यात आले आहे. त्यामध्ये एक विषय किल्ले अजिंक्यतायाचा असल्याचे समजते. अजिंक्यताराच्या रस्त्याच्या कामाची निविदा ज्यादा दराने घेतली असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत कुठल्या आहे. त्यावरून हा विषय या दोन्ही सभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातारा पालिकेकडे सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी केलेल्या तक्रार जात नमूद केले आहे की किल्ले अजिंक्यताराच्या रस्त्याची निविदा प्रक्रिया ते कायदेशीरपणे केलेले आहे ज्यादा दराने काम देण्यात आले आहे त्यावर आपली हरकत आहे, असे म्हटले आहे.