प्रतिनिधी /मडगाव
मिराबाग-सावर्डे भागात बऱयाच बेकायदेशीर चिऱयांच्या खाणी असून काल एका चिरेखाणीत चिरे आणण्यासाठी गेलेला ट्रक अचानक पाणी आल्याने पाण्याखाली गेला. या ट्रकावर दोन कर्मचारी होते. त्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी ट्रकाच्या केबिनवर चढणे भाग पडले.
मिराबाग परिसरात अनेक चिऱयांच्या खाणी असून या खाणी बेकायदेशीर आहेत. त्यांना कोणतीच शासकीय यंत्रणा किंवा पर्यावरण विभागाचा परवाना नाही. चिरे काढून झाल्यानंतर त्या खाणी बुजवत नसल्याने समस्या निर्माण होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
चिरे काढून झाल्यावर खाणी बुजविल्या जात नसल्याने त्यात पावसाचे पाणी साचून रहात. काल दुपारी एका खाणीवर ट्रकमध्ये चिरे भरण्याचे काम सुरू असताना सदर खाणीच्या बाजूस असलेल्या चिरे खाणीतील पाणी अचानकपणे ट्रक असलेल्या खाणीत आल्याने ट्रक पाण्याखाली गेला तर चिरे भरणारे कामगारांनी तेथून पळ काढला तर दोन कामगार वरती अडकून पडले नंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने अनुचित प्रकार टळला.