प्रतिनिधी / बेळगाव : कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा एक ट्रक अचानक टायर फुटल्यामुळे पलटी होऊन अपघात झाला. ही घटना बुधवारी सकाळी पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर हलगा गावानजीक घडली.
बागेवाडी येथून ऊस वाहतूक करणारा ट्रक आज सकाळी साखर कारखान्याकडे निघाला होता. पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर हलगानजीक या ट्रकचा एक टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून तो पलटी झाला. यातील ऊस रस्त्यावर विखरून पडला असल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली होती. यावेळी प्रसंगावधान राखून ट्रक चालक व क्लीनरने आपला जीव वाचविला.
हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जेसीबीच्या झालेला ट्रक रस्त्यावरून हटवीला. त्यानंतर काही वेळात वाहतूक सुरळीत झाली.