हेल्थवे गोवा रूग्णालयामध्ये (NICU) ॲडमिट असलेल्या नवजात बालकाला एबी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यक्यता होती. यावेळी सावंतवाडी येथून युवा रक्तदाता संघटनेचे गणेश यादव, कृष्णा धूळपनावर, धनराज नाईक यांनी गोवा बांबोळी रूग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. तर लाईफटाईम रुग्णालय पडवे येथे ॲडमिट असलेल्या रूग्णाला ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता होती. यावेळी वसंत सावंत यांनी लाईफटाईम रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यासह गोवा राज्यात वेळोवेळी रक्तदान करत रूग्णांना जीवनदान दिलं जातं. नवजात बालकास जीवदान देण्यासाठी तातडीनं रक्तदान केल्याबद्दल रूग्णांच्या नातेवाईकांनी रक्तदात्यांचे आभार मानले आहेत.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # content writer # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment