न्यायालयीन कोठडीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ
वृत्तसंस्था/ चेन्नई
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या न्यायालयीन कोठडीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. चेन्नई येथील एमपी/एमएलए विशेष न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी संबंधित तारखेला बालाजी यांना हजर करण्याचा निर्देश दिला आहे. बालाजी यांच्यावर नोकरी देण्याच्या नावावर लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. बालाजी यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
कॅश फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीची अनुमती देणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला बालाजी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वीज, उत्पादन शुल्क मंत्री बालाजी यांना छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर 14 जून रोजी चेन्नई येथील एका शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. तर 15 जून रोजी मद्रास उच्च न्यायालयाने बालाजी यांना खासगी रुग्णालयात हलविण्याची अनुमती दिली होती.