इन्फोसिसच्या सलिल पारेख यांना टाकले मागे
वृत्तसंस्था/ बेंगळूर
सद्यस्थितीत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सलिल पारेख यांच्या वेतनात 88 टक्क्यांची वाढ झाल्याची बातमी आली होती. कंपनीने त्यांचे वेतन 79.75 कोटी रुपये करण्याची घोषणा केली होती. आर्थिक वर्ष 2022 मध्ये त्यांचे वेतन 71.02 कोटी राहिले होते. मात्र दुसऱया बाजूला आता विप्रोचे सीईओ थेरी डेलपोर्ट देशातील आयटी क्षेत्रात सर्वाधिक वेतन घेणारे अधिकारी झाले आहेत.
31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात त्यांना 79.8 कोटी रुपयाचे पॅकेज मिळाले आहे. या अगोदरच्या आर्थिक वर्षात 2020-21मध्ये हा आकडा 64.3 कोटी रुपये वर्षाचे पॅकेज होते. त्यांना नऊ महिन्यांसाठी हे पॅकेज मिळाले होते. ते विप्रोसोबत 2020 मध्ये जोडले गेले आहेत.
डेलपोर्ट यांना आर्थिक वर्ष 2022 मध्ये वेतन आणि भत्यांच्या स्वरुपात 13.2 कोटी रुपये कमीशन व अन्य स्वरुपात 19.3 कोटी रुपये व दुसरा भत्ता या स्वरुपात 31.8 कोटी रुपये मिळाले. अन्य लांब टर्मसाठीची रक्कम देण्यात आली होती.
डेलपोर्ट पॅरिस येथे वास्तव
जुलै 2020 मध्ये विप्रोसोबत पॅरिस येथे राहणारे डेलपोर्ट जोडले गेले आहेत. आणि आता थेट कंपनीचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांना रिपोर्ट करत आहेत. या अगोदर ते कॅपजेमिनी समूहाचे सीईओ होते.
सर्वाधिक वेतन
डेलपोर्ट हे देशातील आयटी क्षेत्र्घतील सर्वाधिक वेतन घेणारे अधिकारी आहेत. इन्फोसिसचे सीईओ यांचे वेतन वर्ष 2022 मध्ये 71 कोटी रुपयाचे पॅकेज मिळाले होते. जे आर्थिक वर्षात 43 टक्के अधिक होते. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांना यावेळी 25.77 कोटी रुपये वेतन मिळाले असून जे मागील आर्थिक वर्षापेक्षा 27 टक्के अधिक आहे.