विविध मॉडेल्सचा राहणार समावेश : 1 ऑक्टोबरपासून होणार बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा आता पुढील महिन्यापासून खिशावरचा भार वाढणार आहे. कारण अनेक कार ब्रँडच्या किमती वाढणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून, टाटा मोटर्स आणि किया इंडिया त्यांच्या काही कार मॉडेल्सच्या किमती वाढवतील. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कार किंवा व्यावसायिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 30 सप्टेंबरपर्यंत बुकिंग करण्याच्या सूचना वाहन क्षेत्रातील अभ्यासकांनी दिल्या आहेत.
किया सेल्टॉस आणि केर्न्सच्या किंमती वाढतील
ऑटोमेकर किया इंडिया 1 ऑक्टोबरपासून आपल्या कार मॉडेल्स सेल्टोस आणि केर्न्सच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढवणार आहे. कंपनीने सांगितले आहे की कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किया इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख (विक्री आणि विपणन) हरदीप एस ब्रार म्हणाले की, आम्ही सेल्टोस आणि केर्न्सच्या किमती वाढवत आहोत. कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे किमतींवर वाढीचा दबाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
किया सेल्टॉसची किंमत वाढणार नाही?
किया इंडियाने रिअल ड्रायव्हिंग एमिशन नियमांची पूर्तता करण्यासाठी आपला पोर्टफोलिओ अपग्रेड केल्यामुळे या वर्षी एप्रिलमध्ये शेवटची किंमत वाढवली होती. तथापि, कंपनीने आपल्या एंट्री-लेव्हल मॉडेल सोनेटच्या किमती वाढवणार नसल्याचे सांगितले आहे. टाटा मोटर्स व्यावसायिक वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार असून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती सुधारत आहे, त्यानंतर अशा वाहनांच्या किमती 3 टक्के वाढतील.