मे महिन्यात केवळ 54 मी.मी. पावसाची नोंद : 2021 मध्ये 100.2 मी.मी. तर 2022 मध्ये 132 मी.मी.पावसाची नोंद
बेळगाव : यावर्षी वळिवाने ओढ दिली आहे. केवळ आतापर्यंत दोनच वळीव पाऊस झाले आहेत. मे महिन्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये 100 मी.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र यावर्षी सरासरी केवळ 54 मी.मी. पावसाची नोंद बेळगाव जिल्ह्यामध्ये झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त बेळगाव तालुक्यात 83 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. मान्सूनचे आगमनही काहीसे उशिराने होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मान्सूनदेखील यावर्षी कमी प्रमाणात होणार का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये वळिवाची दमदार हजेरी झाली होती. 2021 सालच्या मे महिन्यामध्ये जिल्ह्यात सरासरी 100.2 मी.मी. पावसाची नोंद झाली तर 2022 मध्ये 132 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस फारच कमी झाला आहे. एप्रिल तसेच मे महिन्यात मागील दोन वर्षांमध्ये पावसाची अधिक नोंद झाली आहे. मात्र यावर्षी या दोन महिन्यांमध्ये फारच कमी पाऊस झाला आहे. वळीव पाऊस गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कोसळला होता. मात्र यावर्षी फारच कमी पाऊस झाला आहे. फेब्रुवारीपासूनच या पावसाला सुरुवात झाली होती. मात्र यावर्षी मे महिन्याच्या अखेरीलाच वळिवाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अद्याप एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मशागत करणे अवघड झाले आहे.
पाणी समस्या गंभीर
गेल्या काही वर्षांमध्ये वळिवाबरोबरच मान्सूनही दमदारपणे कोसळत आहे. त्यामुळे पुराचा फटका बसला आहे. वळिवाच्या पावसानेच अनेक ठिकाणी पूर आला होता. नदी-नाल्यांनाही पाणी तुडुंब भरले होते. मात्र यावर्षी वळीव पाऊस झाला नसल्याने पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. जिल्ह्यातील जलाशये तसेच तलावांचे पाणी कमी झाले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांचेही पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जूनच्या 4 तारखेनंतर मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र तो अंदाज खरा ठरणार का? हे पहावे लागणार आहे. जर मान्सूनचे आगमनही वेळेत झाले नाही तर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2021 मध्ये एप्रिल व मे महिन्यात झालेला पाऊस
तालुका एप्रिल महिन्यातील पाऊस (मी.मी.) मे महिन्यातील पाऊस (मी.मी.)
- अथणी 20.4 62.4
- बैलहोंगल 58 120.7
- बेळगाव 69.8 146.2
- चिकोडी 43.8 92.8
- गोकाक 22.3 68.2
- हुक्केरी 43.5 104.5
- खानापूर 56.2 202.3
- रामदुर्ग 40.3 63.8
- रायबाग 12.6 64.9
- सौंदत्ती 45.2 88.8
- कित्तूर 71.8 155.6
- निपाणी 54.5 58.3
- कागवाड 19 52.3
- मुडलगी 5.7 40.4
- सरासरी 40.2 100.2
2022 मध्ये एप्रिल व मे महिन्यात झालेला पाऊस
तालुका एप्रिल महिन्यातील पाऊस (मी.मी.) मे महिन्यातील पाऊस (मी.मी.)
- अथणी 63 166
- बैलहोंगल 70 112
- बेळगाव 97 98
- चिकोडी 76 103
- गोकाक 42 129
- हुक्केरी 52 113
- खानापूर 65 85
- रामदुर्ग 38 124
- रायबाग 60 157
- सौंदत्ती 54 107
- कित्तूर 80 133
- निपाणी 73 116
- कागवाड 58 175
- मुडलगी 47 164
- सरासरी 65 132
2023 मध्ये एप्रिल व मे महिन्यात झालेला पाऊस
तालुका एप्रिल महिन्यातील पाऊस (मी.मी.) मे महिन्यातील पाऊस (मी.मी.)
- अथणी 11 41
- बैलहोंगल 44 57
- बेळगाव 27 97
- चिकोडी 39 41
- गोकाक 33 70
- हुक्केरी 25 67
- खानापूर 20 46
- रामदुर्ग 22 56
- रायबाग 17 37
- सौंदत्ती 26 52
- कित्तूर 19 55
- निपाणी 20 39
- कागवाड 6 17
- मुडलगी 16 73
- सरासरी 24 54