ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Threat of terrorist attack on Haji Ali Dargah मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञाताने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन करुन ही धमकी दिली. धमकीचा फोन उल्हासनगरमधून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कंट्रोल रुममध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबईत 17 दहशतवादी येणार असून, ते हाजी अली दर्ग्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची धमकी दिली. या फोननंतर तात्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याव्यतिरिक्त बीडीडीएस, कॉन्वेंट वेनलाही पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एलअँडटीच्या प्रोजेक्ट साईटची तपासणी केली. पण काहीच संशयास्पद हाती लागलं नाही.
अधिक वाचा : सरळसेवा कोट्याकरिता पदभरती निर्बंध शिथिल
ज्या नंबरवरुन हा फोन आला होता. त्या नंबरवर पोलिसांनी फोन केला असता तो बंद होता. प्राथमिक तपासात संबधित फोन उल्हासनगरहून आला असल्याचे समोर आले असून, पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.