गारगोटी : प्रतिनिधी
मिणचे खुर्द येथील नवीन घर बांधकामासाठी आणलेल्या दिड टन सळी चोरी प्रकरणी मुद्देमाल, टेंपो व चालकासह तिघांना भुदरगड पोलीसांनी अटक केली आहे. वैभव महादेव देसाई रा. गिरगाव, अक्षय शिवाजी मेंगाणे, शिरिष मनोहर मेंगाणे रा. निळपण, आकाश पंढरीनाथ देसाई रा. म्हसवे अशी चोरट्यांची नावे आहेत. मिणचे परिसरात चोर्या करणारे हे रॅकटे मोठे असुन पोलीस तपासात आणखीन काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिणचे खुर्द येथील संदीप सुतार यांनी नवीन घराच्या बांधकामासाठी आणलेली दिड टन सळी चोरट्यांनी हातोहात लांबवली होती. त्यामुळे संदीप सुतार हताश झाले होती. सळी चोरी प्रकरणी भुदरगड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला होता. चोरीचे सिसिटीव्ही फुटेज संदीप सुतार यांना मिळाले होते. एमएच 13 ए एक्स 7149 या टेम्पो मधून सळी चोरीला गेली असल्याचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागले होते. पोलीसांनी वैभव देसाई यास ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याच्याकडून चोरीच्या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलीसांनी मुद्देमाल व टेम्पो ताब्यात घेऊन वैभव महादेव देसाई, अक्षय शिवाजी मेंगाणे, शिरिष मनोहर मेंगाणे, आकाश पंढरीनाथ देसाई यांना अटक केली. आज या चौघांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कष्टडी न्यायालयाने सुनावली आहे