बसमधील वृध्द महिलेची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न. बसचालकाने दाखविलेल्या चालाखीमुळे तिघांना पकडण्यात यश. इतर ठिकाणीही अशा प्रकारांमध्ये हात असण्याची शक्यता.
डिचोली : मुळगाव येथून डिचोली येथे मुन्ना या बसमधून येण्राया एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न करण्राया तीन बांगलादेशी महिलांना डिचोली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी बसचा चालक सुरज मोरजकर यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने सदर तीनही संशयित महिलांना पकडून ठेवण्यात यश आले. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी दिपाली दुर्बा वायंगणकर या महिलेच्या तक्रारीवरून तीनही बांगलादेशी महिलांना अटक केली. हा प्रकार काल बुध. दि. 7 जून रोजी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास घडली. दिपाली वायंगणकर हि महिला शिवोलकर मुळगाव येथून डिचोली येथे मुन्ना नामक बसमधून येत होती. बोर्डे डिचोली येथे पोहोचणारच इतक्यात बसमधील एका महिलेने दिपाली यांच्या खांद्यावर आपला दुपट्टा घातला. तिला आपला दुपट्टा ठिक करण्याची सुचना वृध्देने केली. तेव्हाच सदर महिलेने तिच्या गळ्यात हात घातला व कटरच्या सहाय्याने अलगतपणे सोनसाखळी तोडली.
सोनसाखळीतील पान खाली पडल्याने आला संशय
वृध्देच्या गळ्यतील सोनसाखळी तोडताच सोनसाखळीतील पान खाली पडले त्यामुळे तिला संशय आला. तिने सदर महिलेला ठकाय चोरी करण्यासाठी आलात का ?ठ असा सवाल केला. त्यामुळे एकच गोधळ माजला आणि सदर तीन बांगलादेशी महिलांनी बस थांबल्याचा फायदा उठवत बसमधून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सतर्क झालेल्या बसचालक सुरज मोरजकर याने बस रस्त्यातच उभी करून पळ काढण्राया महिलांचा पाठलाग केला. एका इमारतीच्या मागे पळत असताना तेथे लोकही जमा झाले व त्यांनी तिघांनाही पकडून ठेवले. या घटनेची माहिती डिचोली पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. तेथे त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. दिपाली वायंगणकर यांच्या तक्रारीवरून त्यांना अटक करण्यात आली. सिंधू जयचंद्रा (वय 35), संजना मरमुठू (वय 40), सलगामी कुमार (वय 50) (सर्व राहणारी मंगलपुरी दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे एकही ओळखपत्र किंवा इतर कसलाच दाखला आढळून आला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये म्हापसा, कोलवाळ, वास्को व इतर ठिकाणी घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये या महीलांचा हखत असण्याची शक्यता आहे. अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस उपअधिक्षक सागर एकोसकर, पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोलेकर अधिक तपास करीत आहेत.