खेळता खेळता पार्क केलेल्या गाडीत गेलेल्या मुलांचा गाडीचा दरवाचा लॉक झाल्याने गुदमरून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. हि घटना नागपूरमधील एका संकुलात घडली असून त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही मुले त्यांच्या घरासमोर खेळत होती. खेऴता खेळता अचानक ती गायब झाली. दिवसभर शोध घेऊनही ती सापडली नाहीत. त्यांच्या नातेवाईकांना शोध केल्यावर मुले फारुक नगरच्या मैदानावर खेळण्यासाठी गेली असावीत, असा पालकांचा अंदाज झाला. मात्र, सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुले परत न आल्याने व परिसरात आढळून आल्याने पालकांनी तातडीने स्थानिक पाचपोली पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
प्रशिक्षित पोलिस श्वानामुळे घटना उघडकिस
पोलीसांनी घटनास्थळी आल्य़ावर स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. आणि शेवटी त्यांनी पोलीस श्वानाला पाचारण केले. श्वानाने माग काढत एका पार्क केलेल्या वाहनाजवळ थांबले. गाडीचा दरवाजा उघडताच मुले आत बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना रुग्णालयात पळवले असता ती मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.