मुंबई
घड्याळ, दागिन्यांच्या क्षेत्रात नाम कमावणाऱ्या टायटनचा समभाग मंगळवारी उच्चांकावर कार्यरत राहिला होता. सदरचा समभाग मंगळवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 1 टक्का वाढत 2840 रुपयांवर पोहचला होता. समभागाच्या भावाची ही नवी उंची असल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्याभरात हा समभाग 6 टक्के इतका वाढला आहे. कॅलेंडर वर्षातदेखील कंपनीची कामगिरी चांगली झाली असून समभाग 10 टक्के इतका वधारला आहे.