वेंगुर्ले (वार्ताहर)-
To Rotary District Best Assistant Governor Anward Rajesh Ghatwal
बेळगांव येथे पार पडलेल्या 64 व्या अष्टबंधनम डिस्ट्रीक काँन्फरन्समध्ये या अँवाँर्डचे वितरण
बेळगांव येथे पार पडलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या 64 व्या अष्टबंधनम डिस्ट्रिक्ट काँन्फरन्समध्ये, रोटरी वर्ष 2021-22 चा प्रतिष्ठेचा रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 बेस्ट असिस्टंट गव्हर्नर अँवॉर्ड व सन्मानचिन्ह, सिंधुदुर्गातील असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन राजेश प्रभाकर घाटवळ यांना भावी प्रांतपाल रोटरीयन नासिरभाई बोरसादवाला यांच्या शुभहस्ते व 2021-22 चे प्रांतपाल रोटरीयन गौरिश धोंड, फर्स्ट लेडी रोटरीयन प्रतिमा धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.बेळगांव येथे पार पडलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या 64 व्या अष्टबंधनम डिस्ट्रिक्ट काँन्फरन्समध्ये उपस्थित प्रमुख मान्यवरांत यावर्षीचे प्रांतपाल रोटरीयन व्यंकटेश देशपाbडे, माजी प्रांतपाल डॉ. विनय पै रायकर, गुरुदत्ता भक्ता, राजन देशपांडे, वासुदेव देशिंगकर, आनंद कुलकर्णी, रविकिरण कुलकर्णी, डॉ. गिरीश मसुरकर, संग्राम पाटील, शरद पै, अरुण भंडारे, तत्कालीन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सनत पिळगांवकर, सुभाष साजने, राजेश साळगांवकर, किशोर धुमे, पराग सरदेसाई, अजय मेनन, माधवी शेटये-बांदेकर, डिस्ट्रिक्ट 3170 चे रोटरीयन पदाधिकारी यांचा समावेश होता.
यापूर्वीही रोटरीतील प्रतिष्ठेच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 बेस्ट प्रेसिडेंट अँवॉर्डने त्याना सन्मानित करण्यात आले होते. या सन्मानाबद्दल, त्यांचे रोटरी डिस्ट्रिक्ट 3170, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हयातील क्लब प्रेसिडेंट व पदाधिकारी, रोटरीयन व होम क्लब वेंगुर्ला मिडटाउन प्रेसिडेंट सुनील रेडकर व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.