महिला पतिराजासाठी करणार वडाची पूजा, उपवास
प्रतिनिधी /पणजी
जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभू दे या मागणसाठी आज मंगळवार दि. 14 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला अर्थात वटपौर्णिमेनिमित्त गोव्यातील सुवासिनी महिला वडाची पूजा तर करणार आहेतच याशिवाय वडाला प्रदक्षिणा घालून त्याला दोरा गुंडाळून वटपौर्णिमा व्रत, उत्सव साजरा करणार आहेत.
म†िहलांसाठी त्यांच्या भावनेचा हा प्रश्न असतो. आजच्यादिनी आपल्या पतीराजासाठी त्या संपूर्ण दिवसभर उपवास करीत असतात. काही महिला सोमवारपासून उपवास करून ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदेला म्हणजे दि. 15 रोजी उपवास सोडतात. अनेक घरांमध्ये महिला वडाच्या झाडाची फ्ढांदी आणून तिची पूजा करतात. ज्या गावांमध्ये वडाला पेड बांधलेले आहे, ज्या वडाची मूंज झालेली असते अशा वडाभोवती फ्sढर धरून प्रदक्षिणा घालतात त्याच बरोबर वडाला सूत गुंडाळतात.
वटपौर्णिमा व्रतानिमित्त महिला वडाला विविध मौसमी फ्ढळांचा नैवेद्य दाखवितात व अनेक फ्ढळांचे वाण एकमेकाला वाटून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा व परंपरा गोव्यात आहे. आजच्या या उत्सवानिमित्त राज्यातील बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात फ्ढणस, आंबे, काकडय़ा, केळी, अननस वगैरे फ्ढळे विक्रीस आलेली दिसून आली. वटपौर्णिमेनिमित्त लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी सोमवारी महिलांची मोठी गर्दी दिसत होती. अनेक बाजारपेठांमध्ये वडाच्या झाडाच्या फ्ढांद्यांची मोठय़ा प्रमाणत विक्री झाली.