संवाद परिवार, तळेरेचे संध्याकाळी ६.०० वाजता
आयोजन !
तळेरे : प्रतिनिधी
संवाद परिवार तळेरेच्या वतीने प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त
“शताब्दी संस्मरण अभिवाचन” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.१६ जुलै २०२३ सायंकाळी ठीक ६.०० वाजता वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम.डी.देसाई सांस्कृतिक भवन,तळेरे येथे करण्यात आले आहे.
प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त दर महिन्याला एक अभिवाचन कार्यक्रम (तीन कथा) सादर होणार आहे.प्रत्येक महिन्यात एक अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.जुलै महिन्यातील हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मान तळेरे येथील संवाद परिवाराला मिळाला आहे.सदरचा कार्यक्रम रविवार दि.१६ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवन, तळेरे येथे संपन्न होणार आहे.
यावेळी जी.ए.कुलकर्णी यांच्या माकडाचे काय? माणसाचे काय?, पुनरपी आणि लक्ष्मी या तीन कथा प्रसिध्द अभिवाचक सौ.सीमा मराठे, डॉ.गुरुराज कुलकर्णी आणि सौ.वर्षा सामंत-वैद्य या वाचन करणार आहेत. या विशेष साहित्यिक कार्यक्रमाला रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी केले आहे.