प्रतिनिधी /पेडणे
कडसरे वारखंड येथे साजरा करण्यात येणाऱया तळवणेकर कुटुंबियांच्या सार्वजनिक गणेश चतुर्थीनिमित्त आज शनिवारी रा. 8 वा. तळवणेकर यांच्या निवासस्थानी, हरमल पेडणे येथील नामवंत बालकलाकार तथा कीर्तनकार हभप कु. सना साटेलकर हिचा आज कीर्तन कार्यक्रम होणार आहे. यावेळी तबला तुळशीदास परब तर हार्मोनियम नाना पटेकर हे साथसंगत करणार आहेत. चतुर्थीच्या सहाव्या दिवशी दिनांक 5 रोजी स. 10 वाजता वार्षिक सत्यनारायण महापूजा होणार आहे. त्यानंतर संध्या. 4 वा. स्वप्नील गावकर व साथी कलाकारांचा भजन कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वा. श्री साई समर्थ गोगळेश्वर घुमट आरती मंडळ मडगाव यांचा घुमट आरती कार्यक्रम होणार आहे.