बोगमाळो येथील अमर नाईक खून प्रकरण
प्रतिनिधी /मडगाव
बोगमाळो समुद्रकिनाऱयाच्या वाटेवर 30 वर्षीय अमर नाईक यांच्या दिवसा उजेडा खून प्रकरणासंबंधी मडगावच्या सत्र न्यायालयात उद्या27 मे रोजी आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
15 जुलै 2021 खुनाची ही घटना घडली होती. या खून प्रकरणासंबंधी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शैलेश गुप्ता, शिवम सिंग, रवीशंकर यादव अशी संशयितांची नावे आहेत. कट रचून ख्tढन केल्याचा आरोप वरील सर्व संशयितावर आहे. शिवाय एकावर प्राणघातक हल्ला केल्याचाही आरोप आहे. भारतीय दंड संहितेच्या 307, 302, 120 -ब तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या 25 व्या कलमाखाली या प्रकरणातील संशयिताविरुद्ध वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे.
हा खटला न्यायालयात चालू असताना तिसऱया क्रमांकाचा संशयित आरोपी रवीशंकर यादव याने आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे अशी न्यायालयाकडे विनंती करणारा अर्ज केला होता. हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
उद्या 27 मे रोजी होणाऱया सुनावणीच्यावेळी वरील संशयित आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.