मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी प्रेस्टीज ग्रुपने अलीकडेच डीबी ग्रुपकडून दोन प्रकल्पांचा ताबा आपल्याकडे घेतला असल्याची माहिती आहे. 1176 कोटी रुपये खर्च करुन प्रेस्टीजने एका कराराद्वारे डीबी समुहाकडून प्रकल्पाचे हक्क आपल्याकडे वळते केले आहेत. सदरच्या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरू असून ते पुढील तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रेस्टीज समुहाच्या प्रेस्टीज फाल्कन रियल्टी वेंचर्स यांच्या माध्यमातून सदरचा वरील करार पूर्ण करण्यात आला आहे. मुंबईतील बांध्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सदरचा प्रकल्प कार्यरत आहे.