वृत्तसंस्था/ साओपावलो
फिफाच्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये इंग्लंड आणि अर्जेंटिना संघासमोर खडतर मार्ग असल्याचे जाणवते.
या स्पर्धेमध्ये 4 दक्षिण अमेरिकन संघ तर केवळ 2 युरोपियन संघांचा समावेश आहे. इंग्लंड आणि अर्जेंटिना पुढील फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी खडतर मार्गाला सामोरे जावे लागेल. अर्जेंटिनाचा साखळी सामना नायजेरियाबरोबर बुधवारी होत आहे. ब्राझीलचा सामना ट्युनेशियाबरोबर खेळविला जाईल. फिफाची ही स्पर्धा अर्जेंटिनाने आतापर्यंत सहावेळा, ब्राझीलने पाचवेळा तर इंग्लंडने केवळ एकदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहेत.