दुसरे रेल्वेगेटवर सायंकाळी वाहनांच्या रांगा
प्रतिनिधी /बेळगाव
दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. ट्रकच्या दुरुस्तीसोबतच इतर कामे करण्यात आली. रेल्वेगेट बंद असल्याने दुसरे रेल्वेगेटवर वाहतुकीचा ताण वाढला होता. विकेंड असल्यामुळे तितकीशी गर्दी नसली तरी काही प्रमाणात सायंकाळच्या वेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मिरज ते लोंढा या दरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. पहिले रेल्वेगेट येथे मागील महिन्यात नवीन ट्रक घालण्यात आले होते. प्राथमिक काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱया टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते.
नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेने केले होते. त्यामुळे दुसरे रेल्वेगेट वाहतुकीसाठी वापरले जात होते. विकेंड असल्यामुळे या परिसरात वर्दळ कमी होती. सोमवारी सकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज रेल्वे कर्मचाऱयांकडून व्यक्त करण्यात येत होता.