जेडब्ल्यूजीची 15 वी बैठक आयोजित
वृत्तसंस्था/ ढाका
भारत आणि बांगलादेश यांच्यात व्यापार विषयक संयुक्त कार्यगटाची (जेडब्ल्यूजी) 15 वी बैठक पार पडली आहे. या बैठकीचे आयोजन बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाले आहे. बैठकीचे सहअध्यक्षत्व भारताच्या वाणिज्य विभागाचे संयुक्त सचिव विपुल बन्सल आणि बांगलादेशच्या वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नूर मोहम्मद महबुबुल हक यांनी केले.
बंदरांवरील निर्बंध हटविणे, व्यापाक आर्थिक भागीदारी कराराची अंमलबजावणी, बांगलादेशला आवश्यक सामग्रीचा पुरवठा आणि रस्ते तसेच रेल्वेजाळ्याचा विकास तसेच अन्य मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली आहे.
दोन्ही देशांकडून आर्थिक भागीदारी, क्षेत्रीय सहकार्य आणि निरंतर विकासाबद्दल स्वत:च्या प्रतिबद्धतेच्या पुष्टीसह ही बैठक पार पडली आहे. भविष्यात व्यापार संबंध अणि परस्पर समृद्धीत वृद्धीच्या मोठ्या शक्यत असल्याचा पुनरुच्चार दोन्ही देशांनी केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार सुविधाजनक व्हावा म्हणून अनेक पावले उचलण्यात येणार आहेत.