वाहनांच्या लांबवर रांगा : वाहने घसरून पडण्याचे प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहेत. पण काही ठिकाणी रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः काही चौकांमध्ये रस्ता खराब झाला असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून अपघात घडत आहेत. गोगटे चौकातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे रविवारी दुपारी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
काँक्रीटीकरण करताना चौकामध्ये रस्त्याची जोडणी करण्यासाठी पेव्हर्स ब्लॉक घालण्यात आले आहेत. पण काही ठिकाणी पेव्हर्स खराब झाले आहेत. काही ठिकाणी असलेले पेव्हर्स खचले असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषतः प्रत्येक चौकात ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने वाहनधारकांचे जीव धोक्मयात आले आहेत. गोगटे चौकातील पेव्हर्स खचले असून याठिकाणी वाहनांचे अपघात घडत आहेत. या ठिकाणी सिग्नल असल्याने लाल सिग्नल लागल्यानंतर वाहने थांबवावी लागतात. पण ब्रेक लावल्यानंतर पेव्हर्सच्या ठिकाणी वाहने घसरून दुसऱया वाहनांना धडकत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
गोगटे चौकातील रस्ता रविवारी बंद करून घालण्यात आलेले काँक्रीट आणि पेव्हर्स काढण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे रविवारी गोगटे चौकात वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. रहदारी पोलिसांनी गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला. रहदारी मोठय़ाप्रमाणात असल्याने बीएसएनएल कार्यालयापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.