2200 कोटी रुपयांचे बजेट असणारा चित्रपट
हॉलिवूड स्टार टॉम क्रूजचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल 7’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. हा चित्रपट 14 जुलै रोजी अमेरिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा भारतातील प्रदर्शनाचा मुहूर्त अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. या ऍक्शन-स्पाय चित्रपटाची पटकथा क्रिस्टोफर मॅक्वारी यांनी लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे.
मिशन इम्पॉसिबल 7 या चित्रपटाच्या निर्मितीकरता सुमारे 2 हजार 248 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. चित्रपटात टॉमसोबत विंग रहमेस, सिमोन पेग, रेबेका फर्ग्युसन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
टॉम क्रूज या चित्रपटात स्वतःची प्रसिद्ध व्यक्तिरेखा ईथन हंट साकारताना दिसून येणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे समजते. मिशन इम्पॉसिबल प्रँचाइजी हॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी फिल्म प्रँचाइजीपैकी एक आहे. याच प्रँचाइजीने टॉम क्रूजला सुपरस्टार म्हणून ओळख मिळवून दिली आहे.