वास्को : भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयातर्फे आयसीजी जहाजावर सागरी पोलिसांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मरीन पोलिसांना तटरक्षक दलाच्या इंटरसेप्टर बोटी तसेच किनारपट्टी व बेटांची ओळख करून देण्यात आली. एका आठवड्याच्या या प्रशिक्षणात बोर्डींग ऑपरेशन्स, रेडिओ ऑपरेटींग प्रोसिजर, सीमनशिप इव्होल्युशन्स, अग्निशमन आदी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. गोव्यातील विविध कोस्ट सेक्युरिटी पोलीस स्थानकातील सागरी पोलीस कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
Previous Articleशहर परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस
Next Article अल्पजीवी तरीही प्रभावी…!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.